डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकीमध्ये समान संधी केंद्रांतर्गत कार्यक्रम संपन्न

डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे येथे शासनाच्या समान संधी केंद्रांतर्गत विविध शिष्यवृत्ती योजनांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे फॉर्म भरणे,फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी, शासनाच्या वेगवेगळ्या जाती-जमातींसाठी असलेल्या योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन श्री स्मित कदम व बच्चे पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन समनव्यक डॉ. प्रकाश बंडगर यांनी केले. सदर कार्यक्रमास डॉ. सुहास पाटील, पी. डी. उके, ए. बी गाताडे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे चेअरमन डॉ. संजय डी पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील व कार्यकारी संचालक डॉ. ऐ. के गुप्ता यांनी प्रोत्साहन दिले.