महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी सलग्न डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभिांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे च्या राष्ट्रिय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराद्वारे आज शिबिराच्या तिसऱ्या दिवशी जूने पारगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथे दिवसाची सुरुवात प्रभातफेरी व परिसर स्वच्छतेने करण्यात आली. गावातील स्मशानभूमीच्या सर्व आवाराची स्वच्छता करून त्या ठिकाणी खड्डे घेऊन वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी गावाचे सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य इ. उपस्थित होते.त्यामध्ये विविध प्रकारांची सावली देणारे वृक्ष लाऊन स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात आले. संध्याकाळी जुने पारगाव मधील ज्योतिबा मंदिर येथे गावातील नागरिकांसाठी खासकरून महिलासाठी अन्नप्रक्रिया कार्यशाळा घेण्यात आली. महाविद्यालयाचे प्राध्यापक इंजि.पी. डी. उके, डॉ. वाय. व्ही. शेटे, इंजि. ए. जी. माने यांनी या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शन केले. यात रताळे पासून चिप्स, तुटीफ्रुटी, पावडर आणि सिरप कशे तयार करायचे याचे प्रत्यक्षिक घेण्यात आले. शेतातल्या मालाला जर बाजारात कमी किमंत असेल त्यावेळी त्या शेत माला वरती विविध अन्न प्रक्रिया करून त्यापासून अनेक प्रकारचे अन्न पदार्थ कसे तयार करायचे याची पुरेपूर माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत गावातील महिलांनी उत्साहाने भाग घेतला अन् प्रत्येक बाबींची सखोल माहिती घेतली. कार्यशाळेनंतर रत्याळ्यापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार कसे करावे याविषयी चांगली माहिती प्रत्यक्ष कृती करून मिळ्याल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली तसेच गेले ३ दिवस राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांचे व परिसर स्वच्छतेचे कौतुक केले.